डॉ. तेलतुंबडेच्या अटकेचा तीव्र निषेध !निषेध! निषेध! - सिद्धार्थ मोकळ (भीमशक्ति वाहतूक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )

मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी विचारवंत आनंद तेलतुंबडे आणि डॉ. गौतम नवलखा यांना केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अटक करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे नात जावई आहेत. मा.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहिणीचे मिस्टर यांना नक्षलवादी ठरऊन तसेच पंतप्रधान यांची हत्या करण्याचा कट होता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अटक करण्याचा  कट आहे. 


31डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्या नंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी ला भिमाकोरेगाव येथे सकाळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी दंगल घडवून आणली. यात ऐकबोटेला अटक करून जामिनावर सोडले. पण भिडेला अटक केली नाही. 


एल्गार परिषद झाल्यावर काही ऐक पुरावे नसतानाही ६ जून २०१८  रोजी आणि २८  ऑगस्ट २०१८  रोजी बनावट केस तयार करून खालील लोकांना अटक केली ते आज जेल मध्ये आहेत. 


सुधीर ढवळे, सुरेंद्र गाडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्विस, वर वर राव, सुधा भारद्वाज, शोभा सेन अशा नऊ लोकांना अटक करून जेल मध्ये ठेवलेले आहे. त्याना अद्याप जामिन देखील मिळाला नाही आहे.  


पंतप्रधान यांना मारण्याचा यांनी कट केला याचा कोणताही पुरावा पोलीस किंवा सरकार कडे अद्याप नाही आहे . 


विचारवंत आनंद तेलतुंबडें यांची तब्येत ठीक नाही याचे पुरावे सुप्रीम कोर्टात सादर केले तरी कोर्टाने मोदी आणि शहा यांच्या दडपशाहीने न्याय नाकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा उपयोग आपली मतपेटी सशक्त करून बाबासाहेबांप्रती बेगडी आपुलकी दाखवणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा आता स्पष्ट झाला आहे कारण बाबासाहेबांच्या जयंती दिनीच त्यांचे नातजावई व आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्याचे त्यांनी षड्यंत्र रचले आहे याचा मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तीव्र शब्दात निषेध करीत आहे. 


अवघा आंबेडकरी समाज आपल्या उद्धारकर्त्याच्या जन्मदिनी  जल्लोष करत असताना एका आंबेडकरी विचारवंतला अंधाराच्या खाईत ढकलणे हा अक्षम्य गुन्हा आहे.