वडूज - खटावमध्ये कोरोनाचा टाइमबॉम्ब ! हजारो माणस रस्त्यावर, पोलिसांना नाहक त्रास 


वडूज (विकी बोराटे) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे  संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परन्तु तरीदेखील कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता आज खटाव मधील वडूज या ठिकाणी अचानक रस्त्यावर हजारो माणसांचा ताफा दिसण्यात आला. सरकारने घोषित केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तेरा वाजविले आहेत. या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.


याबाबत अधिक माहिती विचारली असता असे निदर्शनात आले आहे की, आज सकाळ पासूनच अचानक रस्त्यावर रहदारी वाढलेली दिसून आली, परिस्थिति नियंत्रणात आणता आणता पोलिसांना नाकि नउ आले होते. तरीदेखील पोलिसांनी जराही लाठीचार्ज न करता संपूर्ण गर्दीला चौकशी मार्फ़त बाहेर निघण्याचे आणि गर्दी करण्याचे कारण जानून घेतले असता त्यात असे दिसून आले की, काही जनानी न पटणारी अशी उत्तरे दिली तर काही जनाना तेहि जमले नाही. यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागला आहे. 


अद्याप पर्यंत या गर्दीचे खरे कारण हे समोर आलेले नाहीं आहे परंतु सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.